Ranji Trophy 2024 : 4 धावात 4 विकेट्स! दिल्लीच्या गोलंदाजांनी रणजीमध्ये केला चमत्कार, काय घडलं नेमकं ?

Ranji Trophy 2024 : पहिल्या डावात धडाकेबाज फलंदाजी करणारा ओडिसा दुसऱ्या डावात मात्र ढेपाळला
Ranji Trophy
Ranji Trophy Esakal

Ranji Trophy 2024 Delhi Vs Odisha : रणजी ट्रॉफी 2024 मध्ये दिल्ली विरूद्ध ओडिसा सामन्यात ओडिसाची दुसऱ्या डावात 4 धावात 4 बाद अशी झाली. ओडिसाचे पहिले तीन फलंदाज हे शुन्यावर बाद झाले. पहिल्या डावात धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या ओडिसाने दुसऱ्या डावात देखील कच खाल्ला. दिल्लीला पहिल्या डावात 11 धावांची निसटती आघाडी मिळाली.

Ranji Trophy
Ravindra Jadeja Wife : सर्व श्रेय पत्नीला! रविंद्र जडेजाने सामनावीराचा पुरस्कार पत्नी रिवाबाला केला समर्पित

दिल्लीच्या प्रांशू विजयरन आणि हिमांशू चौहान यांनी ओडिसाला दोन धक्के दिले. प्रांशूने स्वस्तिक सुनलचा त्रिफळा उडवत पहिला धक्का दिला. त्यानंतर चौहानने शांतनू मिश्राला आपल्या जाळ्यात अडकवत ओडिसाची असस्था 2 बाद शुन्य धावा अशी केली. त्यानंतर विजयरन ने संदीप पटनाईकला बाद करत ओडिसाला तिसरा धक्का दिला.

त्यानंतर चौहानने अजून एक धक्का देत ओडिसाची अवस्था 4 बाद 4 धावा अशी केली. ओडिसाने पहिल्या डावात चांगला खेळ केला होता. मात्र दुसऱ्या डावात त्यांची अत्यंत खराब सुरूवात झाली आहे.

Ranji Trophy
Yashasvi Jaiswal : जा अन् रोहित शर्माला सांग... अनिल कुंबळेने यशस्वीला दिला कोणता मोलाचा सल्ला?

पहिल्या डावात ओडिसाने 440 धावा केल्या होत्या. फलंदाज सेनापती आणि समंतरे यांनी शतकी खेळी केली होती. त्याच्या प्रत्युत्तरात दिल्लीने 451 धावा करत 11 धावांची आघाडी घेतली होती. यश धूलने 112 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. तर जॉन्टी सिद्धूने 105 धावा केल्या आहेत.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com