Ranji Trophy Musheer Khan : सर्फराजची जागा मुशीरनं घेतली; पहिलं फर्स्ट क्लास शतक केलं खास

Ranji Trophy Musheer Khan Century : मुशीर खानने शतकी खेळी करत मुंबईचा डाव सावरला. सर्फराज खान प्रमाणे मुशीर देखील मोठी खेळी करण्याच्या इराद्यात आहे.
Musheer Khan
Musheer Khanesakal

Ranji Trophy 2024 Musheer Khan 1st First Class Century :

मुंबई, ता. २३ ः मुशीर खानच्या नाबाद १२८ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईच्या क्रिकेट संघाने रणजी करंडकातील बडोद्याविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत पहिल्या दिवसअखेरीस ५ बाद २४८ धावा फटकावल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेची अपयशाची मालिका याही डावात कायम राहिली.

मुंबईने घरच्या मैदानावर खेळताना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ व भूपेन लालवानी या फॉर्ममध्ये असलेल्या जोडीने ५७ धावांची आश्‍वासक भागीदारीही रचली. भार्गव भट्टच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉ ३३ धावांवर बाद झाला आणि जोडी तुटली.

Musheer Khan
WPL 2024 Opening Ceremony : शाहरूखच्या अदाकारीने उद्घाटन सोहळ्याला लागले चार चांद

यानंतर भार्गव भट्टनेच भूपेन लालवानी यालाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याला १९ धावा करता आल्या. अजिंक्य रहाणेकडून या लढतीत दमदार फलंदाजीची अपेक्षा बाळगली जात होती, पण भार्गव भट्टच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला.

१३ चेंडूंचा सामना करणाऱ्या अजिंक्य रहाणेला तीनच धावा करता आल्या. शम्स मुलानीही अवघ्या ६ धावांवर बाद झाला. मुशीर खान व सूर्यांश शेडगे या जोडीने ५२ धावांची भागीदारी करताना डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण भार्गव भट्ट याने सूर्यांश शेडगे याला २० धावांवर बाद करीत मुंबईला बॅकफूटवर नेले.

Musheer Khan
Karnataka cricketer : सामना सुरू असतानाच कर्नाटकचा क्रिकेटपटूचा ह्रदय विकाराच्या झटक्याने झाला मृत्यू

मुशीर खानने डाव सावरला

मुंबईचा संघ ५ बाद १४२ धावा अशा संकटात सापडला. अशा वेळी मुशीर खान व हार्दिक तामोरे या जोडीने १०६ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. मुशीर खान याने २१६ चेंडूंमध्ये १० चौकारांसह नाबाद १२८ धावांची खेळी साकारली. हार्दिक तामोरे ३० धावांवर खेळत आहे. या दोघांवर आता दुसऱ्या दिवशी मुंबईची मदार असणार आहे.

संक्षिप्त धावफलक ः मुंबई - ९० षटकांत ५ बाद २४८ धावा (पृथ्वी शॉ ३३, भूपेन लालवानी १९, मुशीर खान नाबाद १२८ - २१६ चेंडू, १० चौकार, सूर्यांश शेडगे २०, हार्दिक तामोरे नाबाद ३०, भार्गव भट्ट ४/८२) वि. बडोदा.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com