रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेतील चौथी फेरी मंगळवारी संपली.चौथ्या फेरीत शेवटच्या दिवशी विदर्भाने ओडिशावर १०० धावांनी विजय मिळवला. महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक सामना मात्र अनिर्णित राहिला. .रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत मुंबईने तिसऱ्याच दिवशी हिमाचल प्रदेशवर डावाने विजय मिळवला होता. त्यानंतर आता चौथ्या आणि शेवटच्या दिवशी (मंगळवार, ११ नोव्हेंबर) विदर्भाने ओडिशावर १०० धावांनी दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्र आणि कर्नाटक सामना मात्र अनिर्णित राहिला, पण या सामन्यात कर्नाटकने पहिल्या डावातील आघाडीमुळे तीन गुण कमावले, तर महाराष्ट्राला एकच गुण मिळाला. .Ranji Trophy: कर्नाटकचा संघ १५७ धावांनी पुढे; मयांकचे अर्धशतक, रणजी करंडक, महाराष्ट्राकडून जलाज सक्सेना, मुकेश चौधरी चमकले.विदर्भाचा विजयविदर्भाने सुरुवातीपासूनच ओडिशाविरुद्ध वर्चस्व ठेवलं होतं. या सामन्यात ३४५ धावांचे लक्ष्य विदर्भाने ओडिशासमोर ठेवले होते. पण ओडिशाला दुसऱ्या डावात ८४ षटकात सर्वबाद २४४ धावाच करता आल्या. ओडिशाकडून सलामीवीर स्वस्तिक समाल आणि गौरव चौधरी यांनी चांगली सुरुवात केली होती. त्यांनी १०० धावांची भागीदारी केली होती. पण त्यांची जोडी २४ व्या षटकात पार्थ रेखाडेने गौरवला ४७ धावांवर बाद करत तोडली. त्यानंतर रेखाडेने स्वस्तिकलाही ६५ धावांवर बाद केले. नंतर संदीप पटनाईकने २७ आणि कर्णधार सुभ्रांशू सेनापतीने २८ धावांची खेळी करत डाव पुढे नेला. मात्र पहिल्या चार विकेट्सनंतर ओडिशाचा डाव गडगडला. तरी गोविंद पोद्दारने ४६ धावा करत झुंज दिली. मात्र बाकी कोणाची साथ त्याला मिळाली नाही. त्यामुळे ओडिशाला चांगल्या सुरुवातीनंतरही सामना गमवावा लागला. या विजयामुळे विदर्भाला महत्त्वाचे ६ गुण मिळाले आहेत..या सामन्यात विदर्भासाठी ध्रुव शोरे स्टार ठरला. त्याने दोन्ही डावात शतकी खेळी केली होती. प्रथम फलंदाजी करताना विदर्भाने ११८.४ षटकात ध्रुव शोरेच्या १४४ धावांच्या खेळीच्या जोरावर २८६ धावा केल्या होत्या. ओडिशाकडून संबित बरलने ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर ओडिशाने पहिल्या डावात ७३.३ षटकात सर्वबाद १६० धावा केल्या होत्या. त्यामुळे विदर्भाला १२६ धावांची मोठी आघाडी मिळाली होती. विदर्भाकडून कर्णधार सुभ्रांशू सेनापतीने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. विदर्भाकडून या डावात गौरव फारडेने ४ विकेट्स घेतल्या, तर रेखाडेने ३ विकेट्स घेतल्या. विदर्भाने दुसरा डाव ५९ षटकात २ बाद २१८ धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात अमन मोखाडेने १५२ चेंडूत नाबाद १०१ धावांची खेळी केली, तर ध्रुव शोरेने १६१ चेंडूत १०१ धावा केल्या होत्या..महाराष्ट्र-कर्नाटक सामना अनिर्णितपुण्यात झालेला महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक सामना शेवटच्या दिवशी अनिर्णित राहिला, पण कर्नाटकला पहिल्या डावात घेतलेल्या अवघ्या १३ धावांच्या आघाडीचा फायदा झाला. खरंतर शेवटच्या दिवशी कर्नाटकचा दुसरा डाव झटपट संपवून महाराष्ट्राला विजयासाठी प्रयत्न करता आला असता. मात्र कर्नाटकचा कर्णधार मयंक अगरवाल सर्वात मोठा अडथळा ठरला. चौथ्या दिवशी कर्नाटकने दुसऱ्या डावात ५ बाद १४४ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी मयंक ६४ धावांवर नाबाद होता.त्याला अभिनव मनोहरची साथ मिळाली. या दोघांनी सुरुवातीला विकेट्स मिळू दिल्या नाहीत. मयंकने त्याचं शतकही पूर्ण केलं. त्यामुळे कर्नाटकने २३० धावांचा टप्पा पार करता आला. पण मयंकला शतकानंतर सिद्धेश वीरने त्रिफळाचीत केले. त्याने २४९ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकारासह १०३ धावांची खेळी केली. मयंक आणि अभिनव यांच्यात ९२ धावांची भागीदारी झाली..Mumbai Ranji Trophy: मुंबईचा बोनस गुणासह विजय; रणजी क्रिकेट, हिमाचल प्रदेशवर डावाने मात.मयंक बाद झाल्यानंतर अभिनवला श्रेयस गोपळची साथ मिळाली. अभिनवही शतक करेल असं वाटत होतं. पण त्याला ९६ धावांवर विकी ओत्सवालने स्वत:च्याच गोलंदाजीवर बाद करत बाद केले. नंतक वेंकटेशही ५ धावांवर बाद झाला. पण कर्नाटकने ११० षटकात ८ बाद ३०९ धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे महाराष्ट्रासमोर विजयसाठी ३२२ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण हा सामना अनिर्णित राहिल, हे लक्षात घेता दोन्ही कर्णधारांनी हात मिळवले. त्यामुळे महाराष्ट्र संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला नाही.महाराष्ट्राकडून दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना मुकेश चौधरीने ३ विकेट्स घेतल्या आणि विकी ओत्सवालने २ विकेट्स घेतल्या..तत्पुर्वी, कर्नाटकने पहिल्या डावात १११ षटकात ३१३ धावा केल्या होत्या. या डावात मयंक अगरवालने ८० धावांची खेळी केली, तर स्मरण आरने ५४ धावांची आणि श्रेयस गोपाळने ७१ धावांची खेळी केली. अभिनव मनोहरने ४७ धावांची खेळी केली. महाराष्ट्राकडून गोलंदाजी करताना जलज सक्सेनाने ४ विकेट्स घेतल्या, तर मुकेश चौधरीने ३ विकेट्स घेतल्या.त्यानंतर महाराष्ट्राने पहिल्या डावात ९९.२ षटकात सर्वबाद ३०० धावा केल्या होत्या. महाराष्ट्राकडून पृथ्वी शॉ याने ७१ धावांची खेळी केली, तर जलज सक्सेनाने ७२ धावा केल्या.अर्शिन कुलकर्णीने ३४ धावांची खेळी केली, तर रामकृष्ण घोषने ३६ धावा केल्या. कर्नाटककडून श्रेयस गोपाळने ४ विकेट्स घेतल्या, तर मोहसिन खानने ३ विकेट्स घेतल्या..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.