Prithvi Shaw walks back for a duck as Kerala bowlers dominate Maharashtra in Ranji Trophy 2025 clash
esakal
Prithvi Shaw duck, Maharashtra collapse vs Kerala Ranji Trophy 2025 : पृथ्वी शॉ मुंबईसोडून महाराष्ट्र संघासोबत खेळण्यासाठी गेला, तेव्हापासून त्याच्या पदार्पणाची प्रतिक्षा होती. मुंबईविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने जुन्या सहकाऱ्यांना झोडून काढताना शतकी खेळी केली आणि मुशीर खानवर बॅटही उचलली. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला. पण, आजपासून रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राकडून पदार्पण करणारा पृथ्वी ४ चेंडूंत भोपळ्यावर माघारी परतला. केरळच्या गोलंदाजांसमोर महाराष्ट्राच्या फलंदाजांनी गटांगळ्या खाल्ल्या आणि ४ फलंदाज शून्यावर बाद झाले.