HARSH DUBEY 9/53| काव्या मारनच्या संघातील फिरकीपटूची जादू, ९ विकेट्स घेऊन रचला इतिहास; विदर्भाच्या पोट्ट्याने ठोठावले टीम इंडियाचे दार

Harsh Dubey 9/53 bowling figures against Madhya Pradesh: विदर्भाचा युवा फिरकीपटू हर्ष दुबे याने रणजी ट्रॉफीत आपल्या गोलंदाजीने इतिहास घडवला आहे. मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने तब्बल ९ विकेट्स घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.
Harsh Dubey 9/53 bowling figures against Madhya Pradesh

Harsh Dubey 9/53 bowling figures against Madhya Pradesh

Updated on: 

Harsh Dubey creates Ranji Trophy history for Vidarbha: विदर्भच्या हर्ष दुबे याने रणजी करंडक स्पर्धेतील सोमवारपासून सुरू झालेल्या सामन्यात मध्य प्रदेश संघाचे कंबरडे मोडले.. फिरकीपटूच्या माऱ्यासमोर मध्य प्रदेशचे ९ फलंदाज गार झाले आणि त्याने २३.१-४-५३-९ अशी भन्नाट स्पेल टाकून इतिहास घडवला. ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहेच, शिवाय विदर्भकडून रणजी करंडक स्पर्धेतीलही ही सर्वोत्तम स्पेल ठरली. मध्य प्रदेश संघाविरुद्ध अशी गोलंदाजी कोणी केली नव्हती. सनरायझर्स हैदराबादच्या संघात बदली खेळाडू म्हणून दाखल झालेल्या हर्षने रणजी करंडक स्पर्धेचा मागील हंगाम गाजवला आणि आता तो आणखी एक पर्व अविस्मरणीय करण्यासाठी सज्ज झालाय..

Loading content, please wait...