Arjun Tendulkar 47 runs 3 wickets match report
esakal
Arjun Tendulkar Ranji Trophy 2025 performance: मयांक अग्रवाल, करुण नायर सारखे भारतीय फलंदाज संघात असणाऱ्या कर्नाटक संघाला रणजी करंडक स्पर्धेत अर्जुन तेंडुलकरने कडवी टक्कर दिली. मुंबईसोडून गोवा संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अर्जुनने गोलंदाजीत कमाल दाखवताना आधी तीन विकेट्स घेतल्या, नंतर फलंदाजीत सातव्या क्रमांकावर येऊन वादळी खेळी केली. अर्जुनच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे गोवा संघातने सामन्यात पुनरागमन केले, परंतु इतरांच्या अपयशामुळे संघाला फॉलोऑन मिळाला.