

J&K Captain Paras Dogra Headbutts Karnataka Fielder
Sakal
हुबळी येथे रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेचा अंतिम सामना जम्मू-काश्मीर विरुद्ध कर्नाटक संघात खेळवला जात आहे. या सामन्यात जम्मू-काश्मीरच्या फलंदाजांनी वर्चस्व ठेवल्याचे दिसले आहे. त्यांनी ४०० धावाही पार केल्या आहेत.
याचदरम्यान, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (बुधवारी, २५ फेब्रुवारी) मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. जम्मू-काश्मीरचा कर्णधार पारस डोगराची (Paras Dogra) कर्नाटकचा क्षेत्ररक्षक केव्ही अनीशी (KV Aneesh) जोरदार भांडण (Fight) झाल्याचे पाहायला मिळाले.