Chinmay Sutar becomes the first batter in 254 years of first-class cricket to score 800 runs before his sixth innings
esakal
Chinmay Sutar breaks William Ponsford's 101-year-old record: रणजी करंडक स्पर्धेच्या चालू हंगामात सध्या एकच नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजे चिन्मय सुतार याचे... मुळचा मुंबईचा पण मिझोराम संघाकडून खेळणाऱ्या चिन्मयने क्रिकेटच्या इतिहासात २५४ वर्षांत कुणालाही न जमलेला विक्रम केला आहे. मिझोराम विरुद्ध अरुणाचल प्रदेश लढतीत २९ वर्षीय चिन्मयने पहिल्या डावात १७५ धावांची खेळी करून संघाला २८६ धावांची आघाडी मिळवून दिली.
अरुणाचल प्रदेशचा संपूर्ण संघ २८५ धावांत तंबूत परतल्यानंतर सुतारने मैदान गाजवले आणि पहिला डाव ९ बाज ५७१ धावांवर घोषित केला. त्याने २९० चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने १७५ धावांची खेळी केली आणि तो सोडल्यात संघातील एकाही खेळाडूला तिहेरी आकडा गाठता आलेला नाही.