Mumbai dominated the Ranji Trophy: मुंबईच्या रणजी सामन्यातील दबदबा, सिद्धेश लाड शतक, पुदुचेरी संकट यामुळे सामना एकतर्फी दिसू लागला आहे. पाच बाद ६३० धावा करत मुंबईने पुदुचेरीला अवघ्या ४३/४ वर रोखत निर्णायक आघाडी घेतली आहे.
मुंबई : सहाशे धावांचा डोंगर उभा केल्यानंतर मुंबईने पुदुचेरीची चार बाद ४३ अशी अवस्था केली आणि वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी क्रिकेट सामन्यावर असलेली पकड अधिक घट्ट केली.