Ranji Trophy : सर्फराज खानच्या १५४ धावा! मुंबईने डावाने जिंकला सामना; भारताच्या निवड समितीने ज्याला डावलले, तोच नायक ठरला

Mumbai beat Himachal Pradesh by an innings and 97 runs: रणजी ट्रॉफी २०२६-२७ मध्ये मुंबईच्या संघाने हिमाचल प्रदेशवर एक डाव आणि ९७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताच्या कसोटी संघात स्थान न मिळालेल्या सर्फराज खानने या सामन्यात दमदार फलंदाजी करत १५४ धावांची खेळी साकारली.
Sarfaraz Khan

Sarfaraz Khan

Updated on: 

Sarfaraz Khan responds to India selection snub with a century: माजी विजेत्या मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. हिमाचल प्रदेशविरुद्धचा सामना मुंबईने एक डाव व ९७ धावांनी जिंकला. २०२४ पासून भारताच्या कसोटी संघात पुनरागमनाची प्रतीक्षा पाहणारा सर्फराज खान या सामन्यात चमकला. त्याने २२८ चेंडूंत १९ चौकारांसह १५४ धावांची खेळी करताना संघाला मजबूत स्थिती मिळवून दिली. आकाश आनंदनेही ११७ धावांची खेळी करून त्याला साथ दिली. त्यानंतर गोलंदाजांनी कमाल करताना हिमाचल प्रदेशचा डाव गुंडाळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com