India achieves rarest Test record after 93 years vs England 1st Test
इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटीत भारतीय संघाने असा पराक्रम केला, जो मागील ९३ वर्षांत कोणत्याही संघाला करता आला नव्हता. कसोटीत दुर्मिळ मानला जाणारा विक्रम करत टीम इंडियाने इतिहासात आपलं नाव कोरलं आहे. लीड्स कसोटीचा चौथ्या दिवस लोकेश राहुल ( KL Rahul) व रिषभ पंत यांनी गाजवला. दोघांच्या शतकामुळेच भारताला ९३ वर्षा मोठा अन् दुर्मिळ विक्रम करता आला.