Rashid Latif urges Pakistan to boycott the T20 World Cup
esakal
Rashid Latif statement on T20 World Cup boycott: बांगलादेश आणि आयसीसी यांच्यातल्या वादात पाकिस्तान मुद्दाम घुसण्याचा प्रयत्न करतोय. सुरक्षेचं कारण पुढे करून बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतातील सामने श्रीलंकेत हलवण्याची केलेली विनंती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) फेटाळून लावली. काल १६ पैकी १४ सदस्यांनी बांगलादेशच्या मागणीला विरोध दर्शवला आणि जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या आयसीसीने बांगलादेशला २४ तासांची अंतिम मुदत दिली आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही ( PCB) बांगालदेशची मागणी मान्य करा अन्यथा आम्ही पण ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार नाही, अशी भूमिका घेतल्याचे वृत्त Geo News ने दिले आहे.