

Ravi Shastri Explains Why India Are Favourites in T20 WC 2026
Sakal
Ravi Shastri Backs Defending Champions India in T20 WC 2026: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा भारत आणि श्रीलंका येथे खेळवली जाणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणार असून गतविजेता म्हणून मैदानात उतरणार आहे. आत्तापर्यंत टी२० वर्ल्डकप (T20 World Cup) सलग दोन वेळा कोणत्याच संघाला जिंकता आलेला नाही.
त्यामुळे भारतीय संघाला (Team India) हा इतिहास बदलून नवा इतिहास घडवण्याची संधी आहे. याबाबत आता भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मत मांडले आहे. त्यांनी भारतीय संघाला मोलाचा सल्लाही दिला आहे.