
R Ashwin Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा ३८ वर्षीय महान अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विन याने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. ब्रिस्बेन कसोटीनंतर त्याने कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत पत्रकार परिषदेत हा माझा भारतीय संघासाठीचा सर्व प्रकारातील अखेरचा दिवस असल्याचे सांगत निवृत्त झाल्याचे सांगितले.
भारतीय संघाने २०११मध्ये एकदिवसीय विश्वकरंडक जिंकण्याची किमया करून दाखवली. त्यानंतर २०१३मध्ये चॅम्पियन्स करंडकाच्या जेतेपदावरही नाव कोरले. या दोन्ही विजयी संघाचा तो सदस्य होता.