

R Ashwin Talks About Mohammed Shami’s Comeback
esakal
R Ashwin Talks About Mohammed Shami’s Comeback: भारतीय संघाचा माजी फिरकीपटू आर अश्विनने मोहम्मद शमीच्या टीम इंडियातील पुनरागमनाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अजित आगरकर आता निवड समितीचा भाग नसल्याने निवड समितीतील नवीन सदस्य अनुभवी खेळाडूंना पुन्हा संधी देऊ शकतात, असं अश्विनने म्हटलं आहे.
भुवनेश्वर कुमार चार वर्षांनंतर भारतीय संघात परतला आहे, त्यामुळे शमीसाठीही टीम इंडियाचे दरवाजे बंद झालेले नाहीत, असं अश्विनचं म्हणणं आहे.