

R Ashwin and Virender Sehwag’s on-air argument during IPL 2026 has sparked controversy
esakal
IPL 2026 studio controversy Ashwin vs Sehwag details: भारतीय संघाचे माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि आर अश्विन यांच्यात इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पहिल्या सामन्यादरम्यान ऑन एअर भांडण झाल्याचे समोर आले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( RCB vs SRH) यांच्या लढतीचे हिंदी समालोचन सेहवाग व अश्विन एकत्रित करत होते. अश्विनने हिंदी समालोचक म्हणून पदार्पण केले आणि तेव्हा वीरून त्याला मनातून व्यक्त होण्यास सांगितले. विचार करून बोलण्यात काहीच अर्थ नाही, असे वीरूचे म्हणणे होते. यावर अश्विननेही त्वरित उत्तर दिले आणि तो म्हणाला, माझ्या पालकांनी मला काही बोलण्यापूर्वी विचार करण्याची शिकवण दिली आहे.