
Australia vs India 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जेव्हाही सामना होतो, तेव्हा मैदानात काही ना काही घटना घडतच असतात. सध्या देखील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेत आत्तापर्यंत अनेकदा भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज स्टंपवरील बेल्स बदलताना दिसला आहे.
विशेष म्हणजे योगायोगाने भारताला त्यानंतर बऱ्याचदा विकेटही मिळाली आहे. यापूर्वी असे स्टूअर्ट ब्रॉडने असे केले होते, त्यानंतर अनेकांनी त्याची ही कल्पना वापरली. सिराजनेही त्याची कॉपी केली. आता सिराजच्या या कृतीनंतर भारताला मिळालेलं यश पाहून कदाचित आता ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कलाही बेल्स बदलण्याचा मोह आवरता आला नाही.