

VIRAT KOHLI RCB CAPTAINCY
esakal
Parthiv Patel reveals RCB captaincy plan: भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. विराट आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाकडून खेळतो. भारतीय संघाचा माजी खेळाडू पार्थिव पटेल, जो एकेकाळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळत होता, त्याने केलेल्या खुलाशामुळे क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
आरसीबी विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्याचा विचार करत होती, असं पार्थिवने सांगितलं आहे. याआधी इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू मोईन अली यानेही यासंदर्भात असंच काहीसं विधान केलं होतं.