RCB जिंकल्यानंतर टिम डेव्हिड खरंच धुम्रपान करत होता की Viral Video केवळ AI चा बनाव? फिल सॉल्टच्या फोटोने वाढवला सस्पेन्स

Tim David Cigar Viral Video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२६ स्पर्धा जिंकल्यानंतर खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. यावेळीचा टीम डेव्हिड धुम्रपान करत असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खरा आहे की खोटा याबाबत चर्चा आहे.
Tim David Cigar Viral Video:

Tim David Cigar Viral Video:

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पटकावले. रविवारी (३१ मे) अहमदाबादला झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला ५ विकेट्सने बंगळुरूने पराभूत केले. त्यामुळे बंगळुरूने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले.

बंगळुरूकडून (RCB) या हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये टीम डेव्हिडचाही (Tim David) समावेश आहे. मात्र आता तो एका व्हायरल व्हिडिओमुळे (Viral Video) वादात अडकला आहे.

Tim David Cigar Viral Video:
IPL 2026 : RCB ने ट्रॉफी तर जिंकली, पण स्टार खेळाडूला बंदीची शिक्षा; फायनलनंतर BCCI ची कठोर कारवाई
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com