Sai Sudharsan fastest 2000 IPL runs record details
esakal
Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Marathi Update: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या घरच्या मैदानावार गुजरात टायटन्सची दादागिरी पाहायला मिळतेय. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील सामन्यात साई सुदर्शन ( Sai Sudharsan) आणि शुभमन गिल या जोडीने RCB च्या गोलंदाजांना चोप देताना शतकी भागीदारी केली आहे. साईने आयपीएलच्या या पर्वात पाचवा शतकवीर होण्याचा मान पटकावला. संजू सॅमसन ( २) , क्विंटन डी कॉक, अभिषेक शर्मा व तिलक वर्मा यांनी शतकं झळकावली आहेत. आजच्या सामन्यात आयपीएलमधील ख्रिस गेलचा सर्वात मोठा विक्रमही मोडला.