RCB VS KKR LIVE: रायपूरमध्ये पावसाचा तांडव... अर्ध्यातासात चक्र फिरली... मॅच रद्द झाल्यास काय होईल? प्ले ऑफच्या शर्यतीत ट्विस्ट

What happens if RCB vs KKR match is washed out? आयपीएल २०२६मधील अत्यंत महत्त्वाच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध कोलकाता नाइट रायर्ड्स सामन्यापूर्वी रायपूरमध्ये पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली आणि अवघ्या अर्ध्या तासात संपूर्ण चित्र बदलले. सततच्या पावसामुळे मैदान पूर्णपणे कव्हर्सखाली गेले असून नाणेफेकीलाही विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
What happens if RCB vs KKR match is washed out

What happens if RCB vs KKR match is washed out

esakal

Updated on

Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders Marathi Update: रायपूरच्या खेळपट्टीवर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सविरुद्ध विजयासाठी संघर्ष करावा लागला. भुवनेश्वर कुमार व जोश हेझलवूड यांनी अप्रतिम गोलंदाजी करताना MI ला कमी धावांत रोखले, परंतु RCB ची अवस्थाही वाईटच राहिली. कृणाल पांड्या खेळला, म्हणून संघाला रोमहर्षक विजय मिळवता आला. दोन पराभवानंतर RCB ने हा विजय मिळवला आणि आज ते सलग चार विजय मिळवणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करत आहेत. प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी KKR ला विजयाशिवाय पर्याय नाही आणि त्यांचा फॉर्म पाहता ते RCB ला टक्कर देतील हे निश्चित आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com