Suryakumar Yadav walks out for the toss as Mumbai Indians captain
esakal
Royal Challengers Bengaluru vs Mumbai Indians Marathi Updates: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, या सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये मागच्या सामन्यात उभय संघ वानखेडे स्टेडियमवर भिडले होते आणि त्यात RCB ने बाजी मारलेली. पण, आता स्पर्धा निर्णायक टप्प्यात आली आहे आणि MI ला एकही पराभव स्पर्धेबाहेर फेकणारा ठरणार आहे. त्यामुळे पाचवेळचा विजेता संघ उर्वरित ४ सामने जिंकून प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. तेच गतविजेत्यांना मागील दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला आणि त्यांना विजयपथावर परतणे गरजेचे आहे.