RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

IPL 2026 RCB vs MI Marathi Cricket News: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध मुंबई इंडियन्सची फलंदाजी पुन्हा एकदा डळमळीत झाली. आयपीएल २०२६ मधील महत्त्वाच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने सुरुवातीलाच जबरदस्त मारा करत मुंबईला मोठे धक्के दिले. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि अन्य फलंदाज लवकर माघारी परतल्यानंतर मुंबई अडचणीत सापडली होती.
Rohit Sharma angry reaction after Tilak Varma wicket

Rohit Sharma angry reaction after Tilak Varma wicket

Updated on

Royal Challengers Bengaluru vs Mumbai Indians Marathi Updates: मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच स्पेलमध्ये मुंबईला तीन धक्के दिल्यांतर तिलक वर्मा व नमन धीर या जोडीने डाव सावरला. तिलकने दडपणाखाली चांगला खेळ करताना अर्धशतक पूर्ण केले, पंरतु भुवीनेच त्याची विकेट घेतली. भुवीच्या चेंडूवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात तिलक त्रिफळाचीत झाला आणि त्यानंतर डग आऊटमध्ये बसलेला रोहित शर्मा संतापलेला दिसला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com