Royal Challengers Bengaluru and Mumbai Indians
esakal
What happens if RCB vs MI gets abandoned due to rain? रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी रायपूर येथे इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा सामना होणार आहे. काल रायपूर येथील सराव सत्रात पावसामुळे व्यत्यय आला होता आणि दोन्ही संघांच्या खेळाडूंना सराव करता आला नव्हता. रविवारी संध्याकाळी हा सामना होणार की पावसामुळे तो रद्द होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास मुंबई इंडियन्स आयपीएल २०२६ मधून बाहेर पडणार नाही, पण त्यामुळे त्यांचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग अधिक अरुंद होईल.