DY Patil Stadium in Navi Mumbai is set to host five Royal Challengers Bangalore matches in IPL 2026
esakal
RCB home matches in IPL 2026 Navi Mumbai and Raipur: गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये त्यांच्या घरच्या, म्हणजेच चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार नाही. RCB ने आयपीएल २०२६ मध्ये होम गेम पुण्यात खेळवण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार त्यांनी नवी मुंबई व रायपूरची निवड केली आहे. RCB चे आगामी हंगामातील घरचे सामने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियम या दोन ठिकाणी खेळतील असे अपडेट्स आहेत.