Yash Dayal in Legal Trouble Post IPL 2025 Triumph, FIR Registered
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १८ वर्षांच्या प्रयत्नानंतर इंडियन प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावले. पण, त्यानंतर त्यांच्याबाबतीत काही चांगलं घडताना दिसत नाही. विजय मिरवणुकीत झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांना जीव गमवावा लागला. त्यात आता RCB चा भारतीय खेळाडू अडचणीत सापडला आहे. गाजियाबादच्या इंदिरापुरम पोलिस स्टेशन परिसरातील एका तरुणीने जलदगती गोलंदाज यश दयालविरुद्ध मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर लैंगिक छळाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.