Mumbai Indians ने रिलीज केलेल्या खेळाडूने इतिहास घडवला, २४ वर्षांच्या पोराने जाँटी ऱ्होड्सचा विक्रम मोडला; जगात असा पराक्रम करणारा पहिलाच...

Mumbai Indians released player creates world record: मुंबई इंडियन्सकडून रिलीज करण्यात आलेल्या एका खेळाडूने आता थेट जागतिक क्रिकेट इतिहासात आपले नाव कोरले आहे. अवघ्या २४ वर्षांच्या विघ्नेश पुथूरने लिस्ट ए क्रिकेटमध्ये अभूतपूर्व कामगिरी करत जाँटी ऱ्होड्सचा ऐतिहासिक विक्रम मोडला.
Vignesh Puthur created history by taking six catches in a single List A match

Vignesh Puthur created history by taking six catches in a single List A match

esakal

Updated on

Vignesh Puthur breaks Jonty Rhodes fielding record: २४ वर्षीय विघ्नेश पुथूरने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या पर्वात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) साठी चांगली कामगिरी केली होती. त्याने पाच सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. पण, तरिही मुंबई इंडियन्सने ( MI) त्याला आयपीएल २०२६ पर्वापूर्वी रिलीज केले आणि राजस्थान रॉयल्सने या खेळाडूला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. आयपीएल लिलावात RR च्या संघात दाखल झालेल्या विघ्नेशने लिस्ट ए क्रिकेटमध्ये केरळ संघाकडून विजय हजारे ट्रॉफीत पदार्पण करताना विक्रमी कामगिरी केली. अहमदाबादमध्ये त्रिपुराविरुद्ध झालेल्या सामन्यात विघ्नेशने विश्वविक्रम नोंदवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com