

Rinku Singh post for Father
Sakal
भारतीय क्रिकेट संघाने टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा जिंकली. अहमदाबादमध्ये न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात ९६ धावांनी पराभव केला आणि मायदेशात टी२० वर्ल्ड कप (T20 World Cup) उंचावण्याचा पराक्रम केला. भारतीय संघ सलग दोन आणि एकूण तीन टी२० वर्ल्ड जिंकणारा पहिला संघ ठरला.
या ऐतिहासिक विजेतेपदाला आता तीन दिवस झाले असून खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. दरम्यान, हा वर्ल्ड कप भारताने जिंकला असला तरी ही स्पर्धा भारतीय खेळाडू रिंकू सिंगसाठी (Rinku Singh) अत्यंत भावनिक होती.