Rinku Singh Father First Reaction T20 World Cup 2024
Rinku Singh Father First Reaction T20 World Cup 2024 esakal

Rinku Singh T20 WC 24 : मिठाई, फटाके अन् सेलिब्रेशन, रिंकूचा फोन आला अन्... वडिलांनी सांगितलं त्या दिवशी काय घडलं

Rinku Singh Father First Reaction T20 World Cup 2024 : वेस्ट इंडीज आणि अमेरिकेमध्ये येत्या 1 जूनपासून सुरू होणाऱ्या टी 20 वर्ल्डकप 2024 साठी भारतीय संघाची घोषणा झाली. संघाची घोषणा झाल्यानंतर रिंकू सिंहच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. मॅच फिनिशर म्हणून नाव कमावलेल्या रिंकूचं संघात नाव होतं. मात्र तो सामना खेळू शकणार नव्हता. कारण तो स्टँड बायमध्ये निवडला गेला.

रिंकू सिंहच्या वडिलांनी मुलाचं सिलेक्शन होता होता राहिलं याबदद्ल अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली. त्यांनी संघ जाहीर झाला त्यावेळी घरातील वातावरण कसं होतं अन् रिंकूचा फोन आला त्यावेळी वातावरण कसं बदललं हे सांगितलं.

Rinku Singh Father First Reaction T20 World Cup 2024
Jasprit Bumrah: मोठ्या मनाचा बुमराह! मुंबई हरली, पण छोट्या फॅनला असं केलं भलतंच खूश, पाहा Video

सोशल मीडियावर रिंकू सिंहच्या वडिलांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यावेळी एका स्थानिक रिपोर्टने रिंकूच्या वडिलांना प्रतिक्रिया विचारली त्यावेळी रिंकूचे वडील म्हणाले की, 'आम्ही फटाके खरेदी केले होते. सेलिब्रेशन करत होतो. आम्हाला वाटलं की रिंकूची प्लेईंग 11 मध्ये खेळणार. मात्र रिंकूने आपल्या आईला फोन केला आणि सांगितलं की तो संघात निवडला गेलेला नाही तर फक्त अमेरिकेत वर्ल्डकप संघासोबत जाणार आहे. त्यावेळी आई नाराज झाली.'

Rinku Singh Father First Reaction T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप जिंकणे सोडा, टीम इंडिया सेमीफायनलही नाही जाणार; 'या' 4 संघांमध्ये होणार टक्कर?

रिंकू सिंहने भारतीय संघाकडून खेळताना टी 20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने टी 20 सामन्यात अनेकवेळा चांगली फलंदाजी केली. यामुळे रिंकू सिंह भारताच्या टी 20 वर्ल्डकप संघात निवडला जाईल अशी क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र रिंकू सिंह ऐवजी निवडसमितीने शिवम दुबेला जास्त महत्व दिलं. फिनिशर म्हणून दुबेला निवडण्यात आलं. तर रिंकूला स्टँड बाय खेळाडूंमध्ये ठेवण्यात आलं आहे.

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रविंद्र जेडजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

स्टँड बाय खेळाडू : रिंकू सिंह, शुभमन गिल, शलील अहमद, आवेश खान

(Cricket Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com