

Rinku Singh Priya Saroj Wedding Date
esakal
RINKU SINGH PRIYA SAROJ WEDDING DATE: भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्या लग्नाची सध्या चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षी दोघांचा साखरपुडा झाला होता. आता त्यांच्या लग्नाची तारीखही निश्चित झाली आहे.
येत्या डिसेंबरमध्ये लखनऊमधील रमाडा हॉटेलमध्ये दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाची तारीख ठरल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी तयारी सुरू केली आहे.