Rinku Singh : देशासाठी रिंकू सिंग परतणार! वडिलांच्या अंतिम संस्कारानंतर तो कोलकात्यात संघात दाखल होणार, वेस्ट इंडिजला भिडणार...

Rinku Singh rejoins Team India after father’s funeral: रिंकू सिंग वैयक्तिक दुःखातून सावरत पुन्हा एकदा देशासाठी मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. वडिलांच्या निधनानंतर अंतिम संस्कार पार पाडून तो कोलकाता येथे संघात दाखल होणार आहे.
Rinku Singh will rejoin Team India in Kolkata for the crucial Super 8 clash

Rinku Singh will rejoin Team India in Kolkata for the crucial Super 8 clash

esakal

Updated on

Rinku Singh to play IND vs WI Super 8 match: भारतीय संघाचा फिनिशर रिंकू सिंग वडिलांच्या अंतिम संस्कारानंतर तो उद्या भारतीय संघात दाखल होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजित सैकिया यांनी ही माहिती दिली आहे. रिंकूच्या वडिलांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांच्यावर आज अंतिम संस्कार करण्यात आले. त्यानंतर रिंकू शनिवारी कोलकाता येथे भारतीय संघात दाखल होणार आहे आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात त्याच्या खेळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com