Vijay Hazare Trophy : भारतीय संघात परतला अन् Rinku Singh सूसाट सुटला... १५ चेंडूंत ६८ धावांसह ठोकले वादळी शतक

Rinku Singh smashes century vs Chandigarh List A : भारतीय संघात पुनरागमनाची संधी मिळताच रिंकू सिंग अक्षरशः सूसाट सुटला आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२५ मध्ये उत्तर प्रदेश विरुद्ध चंदीगड सामन्यात रिंकूने वादळी फलंदाजी करत अवघ्या ६० चेंडूंमध्ये नाबाद १०६ धावा ठोकल्या.
Rinku Singh unbeaten 106 runs Vijay Hazare Trophy 2025

Rinku Singh unbeaten 106 runs Vijay Hazare Trophy 2025

esakal

Updated on

Rinku Singh 68 runs in 15 balls explosive knock: भारताच्या ट्वेंटी-२० संघात परतलेल्या रिंकू सिंगने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत वादळी शतक झळकावले आहे. चंदीगडविरुद्धच्या सामन्यात रिंकून पाचव्या क्रमांकावर येताना शतकी खेळी करून संघाला ४ बाद ३६७ धावांपर्यंत पोहोचवले. हे त्याचे लिस्ट ए क्रिकेटमधील दुसरे शतक ठरले आणि मधल्या फळीत तो उत्तर प्रदेश संघासाठी ५०+ हून अधिक धावांच्या सरासरीने धावा चोपतोय..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com