RISHABH PANT’S VIRAL APOLOGY TWEET
esakal
Rishabh Pant reacts to India’s Test defeat: भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर चाहत्यांची जाहीर माफी मागितली. आफ्रिकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी बाजी मारून भारताला घरच्या मैदानावर माना खाली घालण्यास भाग पाडले. मागील वर्षभरातील भारताचा हा घरच्या मैदानावरील कसोटीतील दुसरा व्हाईटवॉश ठऱला. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला हटवण्याची मागणी होतेय. अशात रिषभने भावनिक X पोस्ट लिहून चाहत्यांची माफी मागितली आहे.