IND vs SL: भारतीय संघाला मोठा धक्का! कसोटी मालिकेतून जसप्रीत बुमराह बाहेर, कोण घेणार त्याची जागा?

Jasprit Bumrah Likely Ruled out of Sri Lanka Tour : भारतीय संघाला या महिन्यात श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. पण या मालिकेतून जसप्रीत बुमराह बाहेर झाल्याचे समजत आहे.
Jasprit Bumrah | Sri Lanaka vs India Test Series

Jasprit Bumrah | Sri Lanaka vs India Test Series

Sakal

Updated on

India vs Sri Lanka Test Marathi News: भारतीय कसोटी संघ या आठवड्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून तिथे १५ ऑगस्टपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण या मालिकेपूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या मालिकेतून बाहेर झाला असल्याचे समजत आहे.

Jasprit Bumrah | Sri Lanaka vs India Test Series
IND vs SL : श्रीलंकेचा रडीचा डाव! भारतीय संघाला पुरेसा सराव मिळू नये म्हणून लढवली शक्कल; नेमकं काय घडलं?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com