Rishabh Pant comments on Rohit Sharma's absence in Test series
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यापासून नवीन सुरुवात करणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन हे कसोटीतील दिग्गज या मालिकेत टीम इंडियाचे सदस्य नसणार आहेत. या तिघांनी कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे. भारताच्या कसोटी क्रिकेट इतिहासात प्रथमच हे तिघं एकत्रित संघाचा भाग नसतील. रोहितच्या निवृत्तीनंतर कसोटी संघाचे नेतृ्त २५ वर्षीय शुभमन गिलच्या खांद्यावर सोपवले गेले. तोही या जबाबदारीसाठी उत्सुक आहे आणि काल इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी त्याने ती उत्सुकता बोलून दाखवली. पण, त्याचवेळी रोहित व विराट यांची उणीव भरून काढणे अवघड असल्याचेही मान्य केले.