
इंग्लंड विरुद्ध भारत संघात हेडिंग्लेमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू असून रिषभ पंतने हा सामना त्याच्या अतरंगी फलंदाजीने गाजवला आहे. त्याने या सामन्यात अनेक विक्रम करताना नवे विक्रम रचलेही आहेत.
आजपर्यंत कोणत्याच भारतीय यष्टीरक्षकाला न जमलेला कारनामाही त्याने करून दाखवला आहे. या सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात केएल राहुलच्या पाठोपाठ रिषभ पंतनेही शतक ठोकले आहे. त्याचे हे या सामन्यातील दुसरे शतक आहे.
या सामन्यात भारताने दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांच्या विकेट्स तिसऱ्या दिवशीच गमावल्या होत्या. पण चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच कर्णधार शुभमन गिलही ८ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर सलामीवीर केएल राहुलला साथ मिळाली ती रिषभ पंतची.