
भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून, २० जूनपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी जोरदार तयारी करत आहे. संघाने बेकेनहॅम येथे सराव सुरू केला आहे. मात्र, या सराव सत्रादरम्यान यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने आपल्या आक्रमक फलंदाजीने मैदानाशेजारील स्थानिक रहिवाशांना हैराण केलं आहे.