
इंग्लंड विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून (२० जून) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हेडिंग्लेमध्ये सुरू झाला आहे. या सामन्याच्या पहिल्याच डावात भारताने मोठी धावसंख्या उभारली, ज्यात यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि रिषभ पंत यांचे योगदान मोठे राहिले. त्यामुळे पहिल्याच डावात अनेक मोठे विक्रमही झाले.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताना प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांच्यात ९१ धावांची सलामी भागीदारी झाली. केएल राहुल ४२ धावांवर बाद झाला.