IND vs SL 1st Test: रिषभ पंतला संघातून हाकलण्याची वेळ आलीय! फॅन्सची मागणी; माजी क्रिकेटपटूने त्याचा 'common sense' काढला...

Rishabh Pant dropped after Galle Test dismissal: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात रिषभ पंतच्या फलंदाजीवरून नवा वाद निर्माण झाला आहे.
Mohammad Kaif criticises Rishabh Pant common sense

Mohammad Kaif criticises Rishabh Pant common sense

Updated on

Mohammad Kaif criticises Rishabh Pant common sense: आता बस झालं.. याला किती संधी देणार? रिषभ पंतच्या वारंवार त्याच पद्धतीने बाद होण्याला फॅन्स कंटाळले आहेत. वेगाने धावा करण्याची जबाबदारी त्याच्यावर असली तरी तो ज्या पद्धतीने बाद होतोय, त्यावर लोकांचा संताप अनावर झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही तो ३९ धावांवर झेलबाद झाला आणि त्यानंतर नेटिझन्सनी त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. रिषभला संघाबाहेर करण्याची हीच ती वेळ, अशी मागणी होताना दिसतेय. त्यात माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यानेही चांगलेच फटकारले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com