IND vs SL 2nd Test: शतकी खेळीनंतर ध्रुव जुरेलकडेच विकेटकीपिंगची धुरा! दुसऱ्या दिवशीही भारत वरचढ, पण रिषभ पंतने वाढवली चिंता

Why Dhruv Jurel Is Keeping Wickets in 2nd Test? श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ध्रुव जुरेलच्या शतकाच्या जोरावर दुसऱ्या दिवशीही भारताने वर्चस्व ठेवलं. पण दुसऱ्या दिवशी रिषभ पंतऐवजी ध्रुव जुरेलनेच यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली.
Sri Lanka vs India 2nd Test

Dhruv Jurel - Rishabh Pant | Sri Lanka vs India 2nd Test

Sakal

Updated on

Sri Lanka vs India, 2nd Test Marathi News: भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा सोमवारी (२४ ऑगस्ट) दुसरा दिवस होता. या दिवशी भारतीय संघाने वर्चस्व ठेवलं.

पहिला दिवस देवदत्त पडिक्कलच्या (Devdutt Padikkal) शतकाने गाजला, तर दुसरा दिवस ध्रुव जुरेलच्या (Dhruv Jurel) शतकाने गाजवला. त्यामुळे भारतीय संघाला (Team India) भलीमोठी आघाडी घेतला आली आहे. यासोबतच भारताची चिंताही थोडी वाढली आहे.

Sri Lanka vs India 2nd Test
IND vs SL, 2nd Test: पडिक्कलने सलग दुसरं शतक करत ८ वर्षांचा दुष्काळ संपवला! शुभमन गिलचीही फिफ्टी, पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com