Rishabh Pant lit up the IND A vs SA A 1st Test with a stormy 90 off 113 balls
esakal
IND A vs SA A 1st Test Day 4 live score update : दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या रिषभ पंतने भारत अ संघाचे नेतृत्व सांभाळताना दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात वादळी खेळी केली. पहिल्या डावात १७ धावांवर तंबूत परतणाऱ्या रिषभने ११ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी करताना ९० धावा चोपल्या. त्याचे शतक जरी थोडक्यात हुकले असले तरी त्याने संघाला विजयााच्या उंबरठ्यावर आणून बसवले आहे. या खेळीसह त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात पुनरागमनाचा दावा ठोकला आहे.