Sunil Gavaskar: 'जेव्हा मुलं माझ्या हिरोला भेटतात...!', गावसकरांच्या 75 व्या वाढदिवशी रितेश देशमुखने शेअर केला 'तो' Video

Sunil Gavaskar 75th Birthday: सुनील गावसकरांच्या ७५ व्या वाढदिवशी रितेश देशमुखने त्यांचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Sunil Gavaskar Video
Sunil Gavaskar VideoSakal

Riteish Deshmukh Birthday Wish to Sunil Gavaskar: भारतीय क्रिकेट संघाचे महान फलंदाज सुनील गावसकर बुधवारी (१० जुलै) त्यांचा ७५ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारतीय अभिनेता रितेश देशमुखनेही त्यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश देशमुखने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची दोन्ही मुलं सुनील गावसकरांना भेटल्याचे दिसत आहे. त्यांनी गावसकरांकडून त्यांची स्वाक्षरी घेतल्याचेही दिसत आहे. त्यावेळी रितेशची दोन्ही मुलं त्यांच्याकडे अगदी उत्सुकतेने पाहात असल्याचे दिसत आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये रितेशने लिहिले की 'जेव्हा माझी मुलं माझ्या हिरोला भेटतात! दिग्गजांना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीला ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. सुनील गावसकरजी तुम्हाला निरोगी आणि दीर्धायुष्य मिळावं.'

Sunil Gavaskar Video
Sunil Gavaskar IPL 2024 : आयपीएल सोडून देशाकडून खेळणाऱ्या खेळाडूंना शिक्षा करा! गावसकरांनी BCCI कडे केली मागणी

याशिवाय गावसकर यांना रितेशव्यतिक्त अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी तसेच विविध क्षेत्रातील सेलिब्रेटिंनींही शुभेच्छा दिल्या आहेत.

बीसीसीआयने गावसकर यांना शुभेच्छा देताना म्हटले आहे की '१९८३ वर्ल्ड कप विजेते, २३३ आंतरराष्ट्रीय सामने आणि १३२१४ धावा. कसोटीत १० हजार धावा करणारे पहिले क्रिकेटपटू. भारताच्या माजी कर्णधार आणि फलंदाज सुनील गावसकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Sunil Gavaskar Video
Sunil Gavaskar : रोहित लाडका तर विराट.... गावसकरांवर नेटकरी एवढे का भडकले?

गावसकर यांनी १२५ कसोटी सामने खेळले असून ५१.१२ च्या सरासरीने १०१२२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांच्या ३४ शतकांचा आणि ४५ अर्धशतकांचा समावेश आहे. वनडेत त्याने १०८ सामन्यांत ३५.१३ च्या सरासरीने ३०९२ धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा आणि २७ अर्धशतकांचा समावेश आहे.

गावसकर हे कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारे आणि ३४ शतके करणारे पहिलेच क्रिकेटपटू होते.

त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही ३४८ सामने खेळले असून २५८३४ धावा केल्या आहेत. ज्यात ८१ शतकांचा आणि १०५ अर्धशतकांचा समावेश आहे.

Pratima olkha:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com