Rohit Sharma's Name Lights Up Wankhede, Ritika Sajdeh’s Tears Go Viral
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एक अनोखा आणि गौरवाचा क्षण अनुभवायला मिळाला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावाच्या स्टँडचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. या खास सोहळ्यात रोहितसोबत त्याची पत्नी रितिका सजदेह, आई-वडील आणि भाऊ उपस्थित होते. स्टँडचं उद्घाटन करण्यासाठी रोहित समोर बसलेल्या त्याच्या आई-वडिलांना मंचावर घेऊन आला. त्यांच्या हस्ते या स्टँडच्या नावाचे उद्घाटन झाले. यावेळी सासऱ्यांच्या बाजूला उभी असलेली रितिका किंचित भावनिक झाली आणि कुणाला कळू नये म्हणून सासऱ्यांच्या मागे जाऊन गुपचूप डोळे पुसताना दिसली.