

ROHIT SHARMA
esakal
ROHIT SHARMA 2027 WORLD CUP: लवकरच आगामी वनडे वर्ल्ड कपची धूम ही जगभरात सुरू होणार आहे. २०२७ चा एकदिवसीय वर्ल्ड कप हा झिम्बाब्वे, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात संयुक्तपणे खेळवला जाणार आहे.
मात्र, त्याआधी भारताचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू रोहित शर्माने याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या असून, त्याने २०२७ वर्ल्ड कपबद्दल नेमकी काय इच्छा आहे, हे देखील बोलून दाखवलं आहे. JioStar वर दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्माने अनेक मोठे खुलासे केले आहेत.