

Rohit Sharma IPL Records
Sakal
Rohit Sharma Birthday Special: भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा गुरुवारी (३० एप्रिल) त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकून आता जवळपास दोन दशकं उलटली आहे.
रोहितने (Rohit Sharma) गेल्या २० वर्षात अनेक मोठे पराक्रम गाजवले. तो आयपीएलच्या अगदी पहिल्या हंगामापासून खेळतोय. आयपीएलच्या सर्व १९ हंगामाचा भाग राहिलेल्या मोजक्या चार क्रिकेटपटूंपैकी तो एक आहे.
त्यामुळे त्याने गेल्या १९ आयपीएल (IPL) हंगामात अनेक विक्रम केले आहेत आणि मोडले आहेत. पण त्याच्या नावावर असे काही विशिष्ट विक्रम आहेत, जे मोडणं सहजासहजी कोणाला शक्य होणार नाही. त्याच्या आशाच काही विक्रमांचा आढावा घेऊ.