

Rohit Sharma - Sanju Samson
Sakal
Rohit Sharma Advice to Sanju Samson Video: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. भारताला उपांत्य फेरीत पोहचवण्याच यष्टीरक्षक फलंदाजी संजू सॅमसनचेही मोठे योगदान राहिले. त्याने रविवारी (१ मार्च) कोलकाताला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुपर-८ मधील विजयात मोलाचा वाटा उचलला.
भारताने हा 'करो वा मरो'चा सामना ५ विकेट्सने जिंकत उपांत्य फेरी (Semifinal) गाठली. या सामन्यात १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सॅमसनने (Sanju Samson) ५० चेंडूत नाबाद ९७ धावांची खेळी केली. भारतासाठी हा टी२० वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) सर्वोच्च धावांचा पाठलाग ठरला.