T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Sharma and Ajit Agkar held a press conference at the BCCI headquarters; कॅप्टन्सीवर प्रश्नाला गडबडला आगरकर; मात्र रोहितनं बाजू सावरून घेतली.
T20 WC 2024 Team India Squad
T20 WC 2024 Team India SquadESAKAL

T20 WC 2024 Team India Squad : रोहित शर्मा आणि अजित आगकर यांनी टी 20 वर्ल्डकप संघ निवडीनंतर आज बीसीसीआयच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित आगकरला हार्दिक टी 20 ची कॅप्टन्सी करत होता मग मधेच रोहित शर्माला का कॅप्टन्सी दिली असा पेचात टाकणारा प्रश्न विचारला. यावर अजित आगकर उत्तर देत होता. मात्र रोहितनं आगरकरची बाजू सावरून घेतली.

T20 WC 2024 Team India Squad
PCB T20 WC Team Announcement : पाकिस्ताननं आयसीसीची डेडलाईन केली मिस, तारीख उलटून गेली तरी संघाचा नाही पत्ता

अजित आगरकर हार्दिक टी 20 संघाचा कर्णधार होता अन् अचानक रोहित कर्णधार झाला याबाबत बोलताना म्हणला की, गेल्या सहा महिन्यापासून आपण पाहतोय की रोहित शर्मा हा जबरदस्त कर्णधार ठरला आहे. तो चांगला खेळाडू देखील आहे. मात्र या उत्तरानंतर रोहितनं मधेच सूत्रं आपल्या हातात घेत नेमकं कारण सांगितलं.

रोहित शर्मा म्हणाला की, हार्दिकला कॅप्टन्सी ही आम्ही टी 20 क्रिकेटमधून विश्रांती घेतल्यामुळं देण्यात आली. आम्ही त्या वेळी कोणत्या फॉरमॅटची महत्वाची स्पर्धा आहे त्यावर कोणत्या फॉरमॅटला जास्त महत्व द्यायचं हे ठरवत होतो.

कोणाला विश्रांती द्यायची आणि कोणाला नाही हे गेल्या निवडसमितीसोबत चर्चा करून ठरवलं गेलं होतं. त्यावेळी अजित आगरकर पिक्चरमध्ये नव्हता. असं सांगत रोहित शर्माने आगरकरची बाजू सावरून घेतली.

T20 WC 2024 Team India Squad
IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

रोहितला तू आधी कर्णधार होतास त्यानंतर कॅप्टन्सी गेली आता पुन्हा तू कर्णधार आहेस असं देखील विचरालं त्यावेळी रोहितनं 'हा आयुष्याचा भाग आहे. यापूर्वी देखील मी कर्णधार नव्हतो आणि अनेक कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे. आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होत नाही. हा खूप चांंगला अनुभव आहे.' असं उत्तर दिलं.

(Cricket Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com