Will Rohit Sharma and Virat Kohli play Australia ODIs 2025?
esakal
रोहित शर्मा (३७) व विराट कोहली (३६) यांनी कसोटीतून निवृत्ती घेतली असून वन डे वर्ल्ड कप २०२७ खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
प्रशिक्षक गौतम गंभीर युवा खेळाडूंना संधी देत असल्याने रोहित-कोहलींचे स्वप्न पूर्ण होईल का यावर शंका आहे.
भारताचा अ संघ ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध कानपूरमध्ये ३ वन डे सामने खेळणार आहे, पण रोहित-कोहली यात सहभागी होण्याची शक्यता कमी आहे.
BCCI Provides Big Update on Rohit and Kohli Ahead of Australia Tour : रोहित शर्मा व विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हा भविष्याचा विचार करून टीम इंडियात सातत्याने बदल करतोय आणि युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी देतोय. रोहित व विराट यांच्या कसोटीतून निवृत्तीमागे हेच कारण असल्याची दबकी चर्चा आहे. मागच्या वर्षी वर्ल्ड कप उंचावल्यानंतर दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर कसोटी व वन डे क्रिकेट हेच त्यांचे ध्येय होते, परंतु इंग्लंड दौऱ्यापूर्वी बरंच काही घडलं अन् दोघांनी कसोटीलाही रामराम केला.