आयसीसीने २० ऑगस्टला जाहीर केलेल्या वन डे क्रमवारीतून रोहित शर्मा आणि विराट कोहली अचानक गायब झाले.
मागील आठवड्यात रोहित दुसऱ्या तर कोहली चौथ्या स्थानावर होते.
नवीन क्रमवारीत फक्त शुभमन गिल (१ला) आणि श्रेयस अय्यर (६वा) भारतीय खेळाडू अव्वल १० मध्ये आहेत.
Why did Rohit Sharma and Virat Kohli disappear from ICC ODI rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीतून विराट कोहली व रोहित शर्मा यांचे नाव न दिसल्याने सर्वांना झटका बसला. भारताचे हे दोन्ही दिग्गज ट्वेंटी-२० व कसोटी संघाचे आता सदस्य नाहीत आणि त्यात आयसीसीने वन डे क्रमवारीतून त्यांना वगळल्यानं त्यांच्या निवृ्त्तीच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.