
भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा अखेरच्या टप्प्यात असतानाच भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून बुधवारी निवृत्तीची घोषणा केली आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेनंतर भारताला इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी जायचे आहे. त्यापूर्वीच रोहितने कसोटीतून निवृत्त होण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला आहे.